रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे

लवंग आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊयात.

लवंगेमुळे हाडं मजबूत होतात. हाडांचं आरोग्य सुधारतं.

लवंगेमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने यामुळे इम्युनिटी वाढते.

लवंगेमुळे दातांच्या समस्या कमी होतात.

लवंगेमुळे पचनशक्ती वाढते आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होतात.

डोकेदुखी,सर्दी आणि खोकल्याची समस्याही लवंगेमुळे दूर होते.

लवंगेमध्ये युजेनॉल नावाच्या वेदना कमी करणाऱ्या घटकाचा समावेश आहे. यामुळे यकृताशी संबंधित आजारही कमी होतात.

लवंगेमुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते.