खजूर लय भारी, आरोग्यासाठी गुणकारी

खजूर नुसतेही खाता येतात. तसेच दुधातून खजूर घेतल्याने त्याची पोषक तत्व वाढतात. रात्री झोपताना खजूर खाल्ल्याने खूप फायदे होतात.

खजूर खाल्ल्यामुळे इम्युनिटी वाढते. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फायबर आणि ॲन्टिऑक्सिडंट असतात. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. 

ग्लासभर दुधात खजूर मिसळून सेवन करावं. रक्तदाबावर नियंत्रण राहतं.

शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतात.

मजबूत हाडांसाठी खजूर खाणं उपयुक्त ठरतं. खजूर दुधासोबत घेतल्याने झोपही चांगली लागते.

खजुरात व्हिटॅमिन ए असतं जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. दररोज खजूर खाणं डोळ्यांसाठी फायद्याचं ठरतं.

खजुरामध्ये प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन असतं. यामुळे शरीरात एनर्जी येते. 

खजूर फायबरचं भांडार आहे. फायबरमुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

शरीरात आयर्नची कमतरता  असणं हे अनेक आजारांचं मूळ आहे. खजूर रक्त वाढवण्याचं काम करतात. ॲनिमियाच्या आजारात डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात.

खजुरामध्ये व्हिटॅमिन ई असल्याने कांती उजळते. केस निरोगी होऊन वाढण्यास मदत होते.