शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे जाणून घ्या

आजकाल सगळ्या घरांमध्ये शेवगाच्या शेंगा खाल्ल्या जातात. आमटी, सांबार किंवा भाजीमध्ये याचा वापर केला जातो.

शेवग्याच्या शेंगा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे आपण जाणून घेऊयात.

शेंगांमध्ये  कॅल्शियम, जीवनसत्त्वे ए, सी, के, बी तसेच खनिजे- लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे. त्या फायबर आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहेत. त्यामुळे गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी शेंगा खाणं फायदेशीर ठरतं.

शेवग्याच्या शेंगाचा वापर आहारात केल्यामुळे पोटाच्या सगळ्या समस्या दूर होतात.

शेवग्याच्या शेंगांच्या सेवनामुळे डोळे निरोगी राहतात.

पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही शेवग्याच्या शेंगा खाणं फायदेशीर असल्याचं तज्ञ सांगतात.

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीही शेवग्याच्या शेंगा उपयुक्त आहेत.

शेवग्याच्या शेंगांमध्ये  खनिजे कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस असल्याने वाढत्या मुलांची हाडे मजबूत होतात.

शेंगांमधील कोलेजेन प्रोटीनमुळे त्वचा मऊ होते.शेवग्याची पाने किंवा शेंगाची पावडर रक्ताला शुद्ध करण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी करते.