गुळाची खीर खाण्याचे काय आहेत फायदे

Life style

27 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

खीर ही भारतातील सर्वात आवडती आणि पारंपारिक मिष्टान्नांपैकी एक आहे. त्याचबरोबर छठ पूजेच्या वेळी गुळाची खीर बनवण्याचे खूप महत्त्व आहे.

गुळाची खीर का खावी

गुळाची खीर केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या याचे फायदे

गुळाची खीर खाण्याचे फायदे

पचन सुधारणे

गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. गुळाचे सेवन केल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

रक्त वाढण्यास मदत

गुळामध्ये आयरन असते. खीरचे नियमित सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि अशक्तपणाचा धोका कमी होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणे

गुळामध्ये अॅण्टीऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. खीरमध्ये मिसळल्यास ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

हाडे मजबूत करणे

दूध आणि गूळ दोन्हीमध्ये कॅल्शिअम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत राहतात आणि सांधेदुखी कमी होते.

त्वचा आणि केस

गुळामध्ये असलेले खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमक देतात आणि केसांना मजबूत करतात. 

थंडीपासून संरक्षण

गूळ शरीराला उबदारपणा देतो आणि हिवाळ्यात तो खाल्ल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.