पक्क्या केळ्यांप्रमाणेच कच्ची केळी देखील फायदेशीर मानली जातात. कच्ची केळी ही पोषक तत्वांचे भांडार मानले जाते.
जर तुम्ही रोज कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात, ते जाणून घ्या
कच्च्या केळांमध्ये व्हिटॅमीन, फायबर, पोटॅशिअम, आयरन, मॅग्नेसिअम, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी6 इ. प्रथिने असतात.
ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांनी कच्ची केळी खावी. कारण यामध्ये आयरन असते आणि आयरन रक्ताची पातळी वाढवते.
ज्यांना हृद्यासंबंधित आजार आहे त्यांनी कच्ची केळी खावी. त्यामध्ये पोटॅशिअम असते. पोटॅशिअम हृदयाची काळजी घेते.
ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्या लोकांनी आपल्या आहारामध्ये कच्च्या केळीचा समावेश करावा. त्यामध्ये व्हिटॅमीन सी असते.
ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी कच्ची केळी खावीत. यामध्ये फायबर असते त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात
कच्ची केळी मर्यादेत खावी. जास्त खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते.