मेथीच्या दाण्यांचे पाणी अनेक समस्यांपासून आराम देते. याचे फायदे आपण जाणून घेऊयात.

औषधी गुणधर्मांमुळे मेथी आयुर्वेदातला महत्त्वाचा घटक आहे.

मेथीच्या पिवळ्या बियांचं पाणी महिलांच्या अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करतं.

अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालंय की, मेथीच्या बियांचं पाणी प्यायल्यामुळे महिलांच्या मासिक पाळीचा त्रास कमी होतो.

मेथीच्या बियांचं पाणी पुरुषांसाठी देखील फायदेशीर  आहे. मेथीचं पाणी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवतं.

 मेथीच्या दाण्यांमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे त्वचेखालील घाण काढून टाकतं.

सकाळी मेथीचं पाणी प्यायल्यास चेहऱ्याशी संबंधित आजार दूर होतात.डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी होण्यासही यामुळे मदत होते.

मासिक पाळी सुरू होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी सकाळी लवकर मेथी दाण्यांचं पाणी पिणं सुरू करा. मासिक पाळीच्या वेळी होणारे त्रास दूर होतील.

बाळंतिणीचं दूध वाढावं म्हणूनही मेथीचं पाणी पिणं फायदेशीर ठरते.

मेथीच्या बियांचं पाणी मधुमेह आणि उच्च रक्तदाब दोन्ही नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतं.