लिची या फळासोबतच याची साल देखील अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
लिची खाल्ल्यानंतर आपण त्या फळाची साल फेकून देतो.
लिचीच्या सालीचा विशिष्ट पद्धतीने वापर करून त्वचेच्या विविध समस्यांवर कशी मात करु शकतो ते जाणून घेऊयात.
टाचा स्वच्छ करण्यासाठी लिचीच्या सालीचा उपयोग होऊ शकतो.
प्रथम लिचीची साल बारीक वाटून घ्या आणि मुलतानी माती, बेकिंग सोडा, ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करा.
आता ही पेस्ट टाचांवर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या, नंतर प्युमिस स्टोनने स्वच्छ करा. यानंतर टाच स्वच्छ आणि मऊ होईल.
डेड स्कीन काढण्यासाठीही लिचीच्या सालीचा उपयोग होतो.
लिचीची साल सुकवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घट्ट पेस्ट बनवा. नंतर त्यात कोरफड जेल, गुलाबपाणी आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.
नंतर काही वेळ हलक्या हातांनी स्क्रब करा, साधारण दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील गोठलेल्या मृत पेशींचा थर निघून जातो आणि त्वचा सुधारते.
Fill in some text
मानेला टॅनिंगची समस्या असल्यास लिचीच्या सालीचा उपयोग करु शकता.
लिचीची साल बारीक करून त्यात बेकिंग पावडर, लिंबाचा रस, खोबरेल तेल, हळद मिक्स करून पेस्ट तयार करा.
त्यानंतर ही पेस्ट मानेवरील टॅनिंगवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. असे केल्याने मानेवरील मृत पेशी बाहेर पडतील आणि टॅनिंगपासून तुम्हाला मुक्ती मिळेल.