जेवल्यानंतर ताक पिणे गुणकारी समजले जाते.

अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष ताकामुळे कमी होतो.

ताक शरीरातील अपचनाचा विकार कमी करण्यास मदत करते.

ताकामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन, प्रोबायोटिक्स घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.

उन्हाळ्यातील डिहायड्रेशन समस्या कमी करण्यासाठी ताक प्यावे. 

ताकामुळे शरीरातील दाह कमी होतो.

ताकाच्या थंड गुणधर्मामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यासही मदत होते.