चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये टाका या गोष्टी

Life style

05 November, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

प्रत्येक जण चांगले दिसण्यासाठी घरगुती उपाय करतो. जर तुम्हाला त्वचा चांगली ठेवायची असेल तर या दोन गोष्टींचा वापर करावा. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

त्वचेची काळजी टिप्स

गव्हाचे पीठ चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते. हे स्क्रबसारखे काम करते आणि त्वचा मऊ आणि स्वच्छ ठेवते.

नैसर्गिक स्क्रब वापरा

दही टॅनिंग दूर करते

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड टॅनिंग काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते.

मध ओलावा आणि चमक

मधामध्ये नैसर्गिक त्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, ते त्वचेला आतून हायड्रेट ठेवते आणि चेहरा चमकदार बनवते.

नैसर्गिक पेस पॅक

दही आणि पीठ एकत्र मिसळल्याने चेहऱ्यावर थंडावा मिळतो. ते त्वचेला आराम देते आणि लालसरपणा कमी करते.

फ्रिकल्स आणि डाग

हा फेस पॅक पिगमेंटेशन कमी करतो आणि चेहऱ्यावरील काळे डाग हळूहळू हलके करतो.

त्वचा मऊ आणि गुळगुळीत 

या पॅकच्या वापराने त्वचा चमकते आणि चेहरा पूर्वीपेक्षा अधिक नितळ वाटतो.

लावण्याची पद्धत

हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा गव्हाचे पीठ त्यामध्ये अर्धा चमचा मध आणि एक चमचा दही मिसळा. त्यानंतर हे चेहऱ्यावर लावून 15 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या