ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक रत्न असतो. जे परिधान केल्याने त्याचे अशुभ परिणाम दूर होण्यास मदत होते. यामधील एक आहे माणिक रत्न
माणिक रत्नाचा संबंध ग्रहांचा राजा सूर्याशी आहे. हे रत्न कोणी परिधान करावे आणि त्याचे फायदे जाणून घ्या
माणिक रत्न लाल रंगांचे असते. तर श्रीलंकेत आढळणाऱ्या माणिकला थोडासा पिवळा रंग असतो.
चांगल्या माणिकाचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्यप्रकाशात ठेवल्यास त्यातून लाल किरणे सर्वत्र पसरू लागतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी हे रत्न परिधान करावे
कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी कुंडलीनुसार हे रत्न परिधान करु शकता. जर एखाद्या व्यक्तीला हृद्य आणि डोळ्यांची समस्या असल्यास ते हे रत्न परिधान करु शकतात
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जरी सूर्य धनस्थानात, दहाव्या घरात, नवव्या घरात, पाचव्या घरात, अकराव्या घरात उच्च असला तरी, माणिक धारण करता येते.
ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत आहे त्यांनी हे रत्न परिधान करावे
रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. ते करंगळीत सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत, किमान पाच कॅरेटच्या माणिकात घालावे.