पाचू रत्न का परिधान करतात, जाणून घ्या

Life style

06 November, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

ज्योतिषशास्त्रामध्ये पाचू रत्नाला विशेष महत्त्व आहे. त्याचा व्यक्तीच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. पाचू रत्न परिधान करण्याचे फायदे आणि नियम जाणून घ्या

पाचू रत्नाचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रामध्ये पन्ना ग्रहाला बुध ग्रहाचे रत्न मानले जाते. बुध ग्रहाला नोकरी, व्यवसाय आणि बु्द्धीचे कारक मानले जाते. बुध ग्रह कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे.

बुध ग्रहाशी संबंध

कधी परिधान करावे

कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत असल्यास त्याचे अशुभ परिणाम होतात. ज्योतिष पाचू रत्न परिधान करण्याचा सल्ला देतात.

चांगला दिवस

पाचू रत्न परिधान करण्यासाठी चांगला दिवस बुधवार आहे. याव्यक्तिरिक्त ज्येष्ठ, आश्लेषा आणि रेवती नक्षत्रात देखील तुम्ही परिधान करु शकता.

सोने आणि चांदी

पाचूला सोने आणि चांदीमध्ये टाकून ते सोन्या किंवा चांदीमध्ये बसवून करंगळीवर घालावे.

परिधान करण्याची पद्धत

बुधवारी ही अंगठी परिधान करण्यापूर्वी मंगळवारी रात्री दुधामध्ये ही अंगठी ठेवावी. त्यानंतर बुधवारी सकाळी ही अंगठी दुधातून काढून गंगाजलाने अभिषेक करुन परिधान करावी

मंत्रांचा करा जप

यानंतर धूप दिवा लावून ओम बुं बुधाय नमः या मंत्रांचा जप करावा.

कोणी परिधान करावे

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी पाचू रत्न परिधान करणे शुभ असते

परिधान करण्याचे फायदे

पाचू परिधान केल्याने चिंतेतून सटका होते. मन शांत आणि एकाग्र राहते. तसेच आर्थिक स्थिती सुधारते. त्यासोबतच त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात