फ्रेंडशिप डे ला तुम्हाला मित्राला किंवा मैत्रिणीला भन्नाट गिफ्ट द्यायचं असेल तर त्यासाठीचे ऑप्शन्स जाणून घ्या.
कस्टमाइज्ड मेमरी स्क्रॅपबुक हा एक चांगला पर्याय आहे.
तुमच्या मैत्रीच्या गोष्टी मांडणाऱ्या तारखांचा एक स्टार मॅप तयार करा. हे एक हटके गिफ्ट ठरेल.
ॲडव्हेंचर बॉक्स किंवा मिस्ट्री बॉक्सदेखील तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.
DIY टेरारियम किट आजकाल अनेक प्रसंगांसाठी गिफ्ट म्हणून दिलं जातं.
स्वत:च्या हाताने लिहून दिलेली पत्रं हेदेखील बेस्ट गिफ्ट आहे.
डिजिटल आर्टिस्टने काढलेलं मित्राचं किंवा मैत्रिणीचं डिजिटल पोर्ट्रेट भेट म्हणून देऊ शकता.
तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला झाडांची आवड असेल तर एक सुंदर रोपाची कुंडी भेट म्हणून द्या. त्या कुंडीवर नाव किंवा मेसेज लिहून घ्या.
फ्रेंडशिप बेल्ट किंवा फ्रेंडशिप ब्रेसलेट द्यायचं असेल तर त्यात मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव त्याच्यात दिसेल असं बघा.