हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान, दानाचे विशेष महत्त्व आहे.
भाद्रपद अमावस्या 14 सप्टेंबर रोजी पहाटे 04:48 पासून 15 सप्टेंबरला सकाळी 07:09 पर्यंत असेल
भाद्रपदाच्या अमावास्येला साध्य योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा विशेष संयोग होणार आहे.
ज्योतिषांच्या मते भाद्रपदाच्या अमावस्येला काही वस्तू घरी आणणे खूप शुभ मानले जाते.
कासव - कासव घरी आणा त्याची विधिवत पूजा करा. उत्तर दिशेल कासव स्थापन करणे शुभ मानले जाते.
स्वस्तिक - हिंदू धर्मात घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावणे चांगले असते असे म्हटले जाते.
नारळ - घरात नारळ आणल्यास देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते, घरात लक्ष्मीचा वास असतो.
कुशा गवत - कुशा गवत अमावस्येला आणणे फलदायी मानतात. धार्मिक कार्य कुशाच्या वापराने पूर्ण होतात.
श्री यंत्र - श्री यंत्रामध्ये लक्ष्मी वास करते. उत्पन्न आणि सौभाग्य वाढते. आर्थिक स्थिती मजबूत होते.