अभिनेत्री भूमी पेडणेकरचा आज 34 वा वाढदिवस आहे.

भूमी पेडणेकरने ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटासाठी 30 किलो वजन वाढवलं होतं. तिने 89 किलोपर्यंत  वजन वाढवलं होतं.

चित्रपट रिलीज झाल्यावर तिने 35 किलो वजन कमी केलं.

वजन कमी करण्यासाठी तिने काय आहार घेतला जाणून घेऊया.

 वजन कमी करण्यासाठी भूमीने व्यायामासोबत खास डाएट प्लॅन फॉलो केला.

तिने साखर खाणं पूर्णपणे बंद केलं.

ती रोज कोरफड ज्यूस प्यायची. त्याशिवाय ती रोज डिटॉक्स वॉटर  प्यायची.

सकाळी नाश्त्यामध्ये स्किम्ड मिल्कसोबत म्युसली, सुर्यफुलाच्या बिया टाकून ती खायची. जिमला जाण्याआधी दोन एग व्हाइटच्या ऑम्लेटसोबत होलवीट ब्रेड आणि पपईदेखील ती खायची.

दुपारच्या जेवणात डाळ तडका, दही, ताक,ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेल्या भाज्या, लोण्यासोबत 2 मल्टीग्रेन भाकऱ्या ती खायची.

कधी कधी ती दुपारी जेवणात ग्रिल्ड चिकन किंवा भाज्यांनी स्टफ केलेला ब्राउन ब्रेड किंवा चिकन ग्रेव्हीसोबत ब्राउन राइस खायची.

रात्री ती जेवणात फळ त्यासोबत ग्रीन टी आणि अक्रोड खायची. ऑलिव्ह ऑइलच्या ड्रेसिंगमध्ये फळं किंवा भाज्या असं ती साधारण 7 वाजता खायची.