भूतानच्या राजांचा भारत दौरा, आसाममध्ये झालं स्वागत
Photo Credit - PTI
भूतानचे राजा
जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आजपासून आठ दिवस भारत दौऱ्यावर आहेत.
त्यांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा तीन दिवस आसाममध्ये आहे. मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी भूतानच्या राजांचं पारंपरिक गमछा भेट देऊन स्वागत केलं.
आसाममध्ये आल्यानंतर वांगचुक यांनी सगळ्यात आधी गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.
कामाख्या मंदिरातल्या दर्शनानंतर ते गुवाहाटीतल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांच्यासोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइट काझीरंगा नॅशनल पार्कलादेखील वांगचुक भेट देणार आहेत.
रविवारी भूतानचे राजा दिल्लीला रवाना होणार आहेत.
वांगचुक हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रातही येणार आहेत.