आरजे अमृता देशमुखचं नाव बिग बॉसमध्ये असताना प्रसाद जवादेसोबत जोडलं गेलं.
या दोघांनी साखरपुडा केल्याची माहिती इन्स्टाग्रामद्वारे दिली आहे.
दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करताना लग्नाच्या तारखेचीही घोषणा केली आहे.
या पोस्टवरून कळतंय की अमृता आणि प्रसाद 18 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत.
बिग बॉसमुळे जुळलेल्या या जोडीने साखरपुडा झाल्याचं जाहीर करताना बिग बॉसमधल्या काही शब्दांचा वापर केलाय.
आम्ही साखरपुडा केलाय. आम्ही एकमेकांना पर्मनंट टीम मेंबर्स म्हणून नॉमिनेट करतोय. कोणताही टास्क समोर आला तर त्याला तोंड द्यायला आम्ही तयार आहोत,असं कॅप्शन साखरपुड्याच्या फोटोंना देण्यात आलंय.
दोघांचीही जोडी खुप सुंदर दिसतेय.
अनेकांनी त्यांना साखरपुड्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
‘बिग बॉसने बना दी जोडी’असंच या दोघांच्या बाबतीत म्हणावं लागेल.