स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे 'बिग बॉस मराठी'
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
मे किंवा जून महिन्यात रिएलिटी शोचा 5 वा सीझन येणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच 5 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येईल
सध्या पाचव्या सीझनसाठी कलाकारांशी संपर्क साधण्यात येत असल्याचं समजतंय.
आता या नव्या सीझनमध्ये कोण सेलिब्रिटी असणार याची उत्सुकता आहे.
पाचवा सीझनही महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचं म्हटलं जातंय.
या नव्या सीझनमध्ये काय नवीन असणार तेसुद्धा लवकरच कळेल.