Published Sept 19, 2024
By Harshada Patole
Pic Credit - social media
195 दिवस अंतराळात राहून विश्व रेकॉर्ड बनवणाऱ्या सुनीता विल्यम्सचा आज वाढदिवस
सुनीता विल्यम्स 19 सप्टेंबर रोजी तिचा 59 वा वाढदिवस पृथ्वीपासून 400 किलोमीटर दूर अंतराळात साजरा करत आहे.
सुनीता विल्यम्स या अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या जूनपासून अंतराळात अडकल्या होत्या. त्यांचा 8 दिवसांचा प्रवास 8 महिन्यांत बदलला आहे.
.
1987 मध्ये, त्यांनी यू.एस. नेव्हल अकादमीमधून भौतिक विज्ञान पदवी प्राप्त करून पुढे इंजिनीअरिंग मॅनेजमेंटमध्ये मास्टर केले.
विल्यम्स यांची जून 1998 मध्ये नासाच्या अंतराळवीर म्हणून निवड झाली.
त्यांचे 30 पेक्षा जास्त वेगवेगळ्या विमानांमध्ये 3000 पेक्षा जास्त फ्लाइंग तास नोंदवले आहेत.
त्यांच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद आहे. सुनीताने 2006 आणि 2012 मध्ये दोनदा अंतराळ प्रवास केला आहे.
या दोन्ही मोहिमांवर त्या 322 दिवस अंतराळात राहिल्या यानंतर 6 जूनला त्यांनी स्टारलाइनर अंतराळ यानात तिसऱ्यांदा उड्डाण केले.
त्यांना अवकाशात जाऊन तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.
मात्र तांत्रिक बिघाडामुळे तिथेच अडकलेल्या सुनीता विल्यम्सचे परतणे फेब्रुवारी २०२५ पर्यंत अपेक्षित आहे.