मंगळवारच्या जाहिरातीवरुन नाराजीनाट्य सुरु झाल्यानंतर बुधवारी दुरुस्त करुन नवी जाहिरात दिली यावर फडणवीसांसह अनेकांचे फोटो झळकले
सरकारच्या जाहिरातीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टिका केलीय
तर दुसरीकडे या जाहिरातीवरुन शिंदे गट व भाजपात चांगलीच जुंपली आहे
या जाहिरातीवरुन दोन्हीकडून बॅनरबाजी तसेच टिका टिप्पणी सुरु आहे
जाहिरातीवरुन बोंडेच्या टिकेला उत्तर देताना, आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आला असं बच्चू कडूंनी म्हटलेय
तर दुसरीकडे बेडूक किती फुगला तरी त्याला मोठं होता येत नाही, असं बोंडेंनी शिंदेंवर टिका केलीय
दुसरीकडे नाराज झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलीय
मात्र दोन दिवसांच्या नाराजीनाट्यानंतर आज शिंदे-फडणवीस एकाच मंचावर येत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला