मुंबईकरांची शान काळी-पिवळी टॅक्सी इतिहास जमा

Photo credit - PTI, Indian Express

पद्मिनी प्रीमियर कंपनीची काळी-पिवळी टॅक्सी गेल्या 60 वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत आहे.

मात्र आता मुंबईकरांची शान असलेली काळी पिवळी टॅक्सी इतिहास जमा होणार आहे. 

मुंबईच्या रस्त्यावर 30 ऑक्टोबरपासून काळी -पिवळी टॅक्सी दिसणार नाही.

प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेडने बनवलेली काळी- पिवळी टॅक्सी 1964 मध्ये मुंबईच्या रस्त्यावर धावू लागली होती. 

 ही गाडी आधी प्रीमियर प्रेसिडेंट म्हणून ओळखली जायची. नंतर राणी पद्मिनीच्या नावावरून प्रीमियर पद्मिनी असं नाव देण्यात आलं.

प्रीमियर पद्मिनीचं उत्पादन 2001 मध्ये बंद करण्यात आलं. 

सरकारने 2008 मध्ये टॅक्सीचं आयुष्य 25 वर्षे निश्चित केलं होतं, ते 2013 मध्ये 20 वर्षे करण्यात आलं.

 डबलडेकर बसनंतर आता मुंबईतून काळी-पिवळी टॅक्सीचं बंद होणं मुंबईकरांना भावूक करणारं आहे.