ॲक्शन सीन शूट करताना, कधी अनावधानाने सिनेमाच्या सेटवर शूटिंगदरम्यान
अपघात घडतात. अनेक बड्या स्टार्सना अशा अपघातांना सामोरं जावं लागलं आहे.
अमिताभ बच्चन यांना कुली सिनेमाच्या दरम्यान झालेला अपघात आजपर्यंत कोणीही विसरू शकलेलं नाही.
डर सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखच्या तीन बरगड्या तुटल्या होत्या
.
खाकी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनलाही हाताला फ्रॅक्चर झाले होते.
शूटआउट एट लोखंडवाला सिनेमाच्या शूटिंगदरम्यान
जॉन अब्राहमच्या गळ्याला गोळी घासून गेली होती. या अपघातात जॉनचा जीवही जाऊ शकला असता.
गुंडे सिनेमाच्या वेळी रणवीर सिंग उंचीवरून खाली कोसळला आणि टाके घालावे लागले होते. तर बाजीराव मस्तानी सिनेमाच्यावेळी घोड्यावरून पडला होता.
ब्रह्मास्त्र सिनेमाच्या दरम्यान आलिया भट्टच्या पायालाही जखम झाली होती.