सलमान खान त्याच्या स्टाईलने, अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतो.
सिनेमांप्रमाणेच सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो.
निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवालासोबत सिनेमाची घोषणा केली आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करणार आहे
सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी शेअर केली आहे.
2014 मध्ये आलेल्या किक सिनेमानंतर साजिद आणि सलमान एकत्र काम करणार आहेत.
"ए.आर.मुरुगदास, नाडियादवालासोबत काम करण्याचा आनंद होत आहे."
हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.