रेखा यांच्या आयकॉनिक 'उमराव जान' चित्रपटाचं स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं.
Picture Credit: Instagram
या चित्रपटाच्या स्क्रिनिंग वेळी अभिनेत्री आलिया भट्ट सुद्धा उपस्थित राहिली होती.
आलियाच्या सुंदर गुलाबी साडीने रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
यावेळी अभिनेत्रीने साडीच्या गुलाबी रंगाला मॅचिंग होणारी पर्स कॅरी केली होती.
हटके कानातले अन् छोटीशी टिकली या संपूर्ण लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती.
आलियाने 'उमराव जान'च्या स्क्रिनिंगवेळी ४४ वर्षांपूर्वीच्या चित्रपटातील लूक हुबेहूब रिक्रिएट केला होता.
'सिलसिला' चित्रपटातील रेखा यांचा गुलाबी साडीतील लूक आलियासाठी डिझायनर रिया कपूरने रिक्रिएट केला होता.
आलियाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.