आमीरच्या मुलीच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर आयरा आणि नुपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
नुपूरने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती, तर आयरा धोती स्टाइल लेहंगामध्ये सुंदर दिसत होती.
वांद्रे येथील ताज लँड्स एण्डमध्ये आयराचं लग्न पार पडलं.
किरण राव, मुलगा आझाद, जुनैदसुद्धा या लग्नासाठी उपस्थित होते.
याआधीही प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
2020 पासून आयरा खान-नुपूर शिखरे डेट करत आहेत.
नुपूर शिखरे बॉलिवूडचा फेमस जिम ट्रेनर आहे.