नोरा फतेही ते झरीन खानपर्यंतच्या ‘या’ आहेत Bollywood Dancing Divas
नोरा फतेहीने तिच्या अप्रतिम नृत्य कौशल्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे.
नोराच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं म्हणजे 2018 च्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’. या गाण्यात नोरा फतेहीने सुंदर बेली डान्स केला आहे.
मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि स्टायलिश कलाकार आहे.
मलायकाच्या सगळ्या हिट गाण्यांमध्ये ‘दबंग’मधील ‘मुन्नी बदनाम’ गाण्याचा पहिला क्रमांक लागतो. आजही या गाण्यावर लोक थिरकत असतात.
झरीन खान ‘रेडी’ चित्रपटातील एका खास गाण्यात दिसली होती.
‘कॅरेक्टर ढिला है’ गाण्यात तिचा डान्सिंग सेन्स सगळ्यांनी अनुभवला होता.
मल्लिका शेरावत ही बॉलीवूडमधली एक चांगली डान्सर आहे.
‘डबल धमाल’ चित्रपटातील ‘जलेबी बाई’ गाणं आणि मल्लिकाचा डान्स कुणीही विसरू शकत नाही.