अजय देवगणचा शैतान सिनेमा बॉक्स ऑफिसवर 8 मार्चला रिलीज झाला.
बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली.
सिनेमाने सुमारे 215 कोटींची कमाई वर्ल्ड वाईड केली आहे.
आता हा सिनेमा लवकरच ओटीटीवर झळकणार आहे.
3 मे रोजी शैतान नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसेल.
वश या गुजराती सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.
माधवन या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत आहे.
बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर हा सिनेमा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालाय.