बॉलिवूड स्टार्स आणि कंजूष हे शक्य वाटत नसलं तरी काही स्टार्स असे आहेत जे पैसे खर्च करताना दहा वेळा विचार करतात. 

सारा अली खानने तिच्या मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितले आहे की, अनावश्यकपणे पैसे खर्च करण्यावर तिचा विश्वास नाही.

श्रद्धा कपूरने तिच्या तू झुठी मैं मकरच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते की, आजही ती सेलमधून कपडे खरेदी करते. 

साधे जीवन जगण्यावर माझा विश्वास असल्याचे विकी कौशलने सांगितले होते. विनाकारण पैसे खर्च करणे त्याला आवडत नाही.

काजोलला अनावश्यक पैसे खर्च करणे आवडत नाही. काजोलचा मित्र करण जोहरने तिला कंजूष असा टॅग दिला होता.

सलमान खान अत्यंत साधे आयुष्य जगतो. अभिनेत्याकडे अजूनही २ बीएचके फ्लॅट आहे.

जॉन म्हणाला होता की तो दोन टी-शर्ट, एक जीन्स आणि चप्पलमध्ये संपूर्ण आयुष्य घालवू शकतो.

शाहरुख खान हा इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. पण भरपूर पैसे खर्च करण्यावर त्याचा विश्वास नाही.