2000 साली हे राम या सिनेमात नासिरुद्दीन शाह ने महात्मा गांधींची भूमिका केली होती.
गांधी हत्येशी संबंधित अनेक पैलू या सिनेमात दाखवण्यात आले.
रजित कपूर यांनीही गांधीजींची भूमिका साकारली होती.
1996 साली आलेल्या द मेकिंग ऑफ महात्मा गांधी सिनेमात ते गांधीजींच्या भूमिकेत दिसले होते.
दिलीप प्रभावळकर यांनीही महात्मा गांधींची भूमिका वठवली होती.
लगे रहो मुन्नाभाई सिनेमात संजय दत्तसोबत ते झळकले होते.
दर्शन जरीवालाही गांधींजींच्या भूमिकेत दिसले होते.
1982 मध्ये आलेल्या गांधी सिनेमात बेन किंग्सले ने गांधींची भूमिका निभावली होती.