अंमली पदार्थांचे व्यसन सोडताना अनेकवेळा नैराश्याचा सामना करावा लागल्याच खुलासा संजय दत्तने केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही डिप्रेशनला बळी पडली होती.
अभिनेता वरुणनेही कबूल केले होते की, बदलापूर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो डिप्रेशनशी झुंज देत होता, तो खूप दिवस डिप्रेशनमध्ये होता.
वॉर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृतिकची तब्येत बरी नव्हती. त्या काळात तो नैराश्याच्या समस्येला तोंड देत असल्याचं खुद्द हृतिकने सांगितलं.
बॉलीवूडचा किंग खानला एकदा त्याच्या खांद्याच्या लिगामेंटला दुखापत झाली होती आणि शस्त्रक्रियेदरम्यान तो प्रचंड नैराश्यात गेला होता.
आलिया भट्टलाही डिप्रेशन, Anxietyचा सामना करावा लागला होता.
आशिकी-2 चित्रपटादरम्यान श्रद्धाला नैराश्याला सामोरे जावे लागले होते.
करण जोहरसुद्धा जवळपास 4 ते 5 वर्ष तणावाच्या समस्येशी सामना करत होता.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही anxiety आणि नैराश्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने मेडिटेशनचा आधार घेतला होता.