कियारा अडवाणी ते पंकज त्रिपाठी ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी गाजवला OTT प्लॅटफॉर्म
अभिनेत्री नर्गिस फाखरीने ओटीटी विश्वात पदार्पण केलंय. ‘टटलूबाज’ या तिच्या वेबसीरिजची खूप चर्चा सुरु आहे.
कियारा अडवाणीने ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘गिल्टी’ सारख्या प्रोजेक्ट्सद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपला एक ठसा उमटवलाय.
तिच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं गेलं.
काजोलने ‘द ट्रायल’ वेब सीरिज आणि ‘लस्ट स्टोरीज 2’ मधील तिच्या भूमिकेने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी केली आहे.
पंकज त्रिपाठी यांची ‘मिर्झापूर’ मधील कालीन भय्याची भूमिका आजही लोकप्रिय आहे.
‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ यादेखील पंकज त्रिपाठींच्या गाजलेल्या वेब सीरिज आहेत.
‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमुळे मनोज बाजपेयी आणि त्यांच्या सहकलाकारांच्या लोकप्रियतेत भर पडली.
मनोज बाजपेयींची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘रे’, ‘गुलमोहर’ आणि ‘बंदा’ या प्रोजेक्ट्सनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली.