ब्रेकफास्ट हेल्दी असण्यासोबतच लवकर तयार होणारा असावा.
फ्रेंच मसाला टोस्ट कमी वेळेत आणि हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे.
साहित्य - ब्रेड, अंडी, 6 टेबलस्पून दूध, मीठ, तिखट, काळीमिरी पावडर,
1 टोमॅटो-कांदा बारीक चिरलेला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चाट मसाला आणि बटर.
चिरलेला टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून एका बाउलमध्ये एकत्र करा.
एका मिक्सिंग बाऊलमध्ये अंडी फोडून त्यात दूध, मीठ, तिखट, काळी मिरी पावडर घालून मिक्स करा.
आता ब्रेड अर्धा तिरपा cut करून अंड्याच्या मिश्रणाता घोळवा.
नॉन-स्टिक पॅन गरम करा, बटर घाला त्यानंतर अंड्याच्या मिश्रणात घोळवलेला ब्रेड पॅनमध्ये ठेवा. गोल्डन ब्राउन करा.
तयार झालेला ब्रेड प्लेटमध्ये घ्या, त्यात कांदा-टोमॅटोचं मिश्रण घाला, केचपसोबत सर्व्ह करा.