मोदी सरकारच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
बजेटमध्ये करदात्यांची निराशा झाली असेल, मात्र अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील योग्य गोष्टी सांगत अर्थमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली.
दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. याचा फायदा 1 कोटी कुटुंबांना होणार आहे.
पीएम आवास अंतर्गत येत्या पाच वर्षांत आणखी 2 कोटी घरे ग्रामीण भागात बांधली जातील.
cervical cancer साठी लसीकरणाला चालना दिली जाईल, 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाईल.
आतापर्यंत 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आले आहे.
राज्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्जासाठी 75,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वंदे भारतच्या 40000 बोगी अपग्रेड केल्या जातील. मेट्रो आणि नमो भारत इतर शहरांशी जोडले जातील.