अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत मिळणारी रक्कम 8,000 होण्याची शक्यता आहे.

कृषी तज्ज्ञांनी पीएम-किसान योजनेची वार्षिक रक्कम 6 हजारांवरून 8 हजार करावी अशी मागणी केली आहे.

या योजनेचं पेंमेंट दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा केले जाते.

आतापर्यंत देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.

पात्रतेसाठी जमीन मालकीची असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याकडून भाड्याने जमीन घेऊन शेती केल्यास लाभ मिळत नाही.

ज्यांनी मागील वर्षी आयकर भरलेला आहे. तसेच नोंदणीकृत डॉक्टर,इंजिनियर,वकीलही पात्र नाहीत.

कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती पीएम-किसान योजनेचा लाभ घेऊ शकते.

या योजनेच्या 17 हप्त्याचा लाभ सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.