1 फेब्रुवारीला सरकार अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सहावा अर्थसंकल्प असेल.
हा अर्थसंकल्प कुठे आणि कसा लाइव्ह पाहता येईल जाणून घ्या.
अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहता येईल. अर्थ मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनल आणि संसद टीव्हीवरही ते थेट पाहता येईल.
1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मांडण्यात येईल
यापूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यात बदल केला.