मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात महापालिका अधिकाऱ्यांची दादागिरी - जितेंद्र आव्हाड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात महापालिका अधिकाऱ्यांची दादागिरी सुरू असून ठाण्याचा मालकी हक्क आपल्याकडेच असल्यासारखे वागत आल्याचा आरोप माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
खास करून महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्या कार्यपद्धती बाबत आव्हाडांनी जोरदार टीका केली.
ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये हजारो अनधिकृत इमारतींची कामे सुरु आहेत. ठाण्यात काय घडत आहे. हेच कळेनासे झाले आहे.
हे मुख्यमंत्र्यांचे ठाणे आहे याची थोडीतरी लाज त्या सहाय्यक आयुक्तांना वाटली पाहिजे.
जर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये बेकायदेशीररीत्या, दादागिरी करुन, जमीन बळकावून, लोकांना घाबरवून, महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने कामे होत असतील, तर मग कोणाकडे न्याय मागायचा अशी टीकाही आव्हाडांनी केली आहे.