टॉयलेट सीटमुळे होऊ शकतं युरिन इन्फेक्शन?

युरिन इन्फेक्शन ही एक सामान्य समस्या आहे जी महिला आणि पुरुषांमध्ये पाहायला मिळते.

बहुतेक प्रकरणांमध्ये ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते, याची अनेक कारणं सांगितली जातात.

लघवीचा संसर्ग जीवघेणा नसला तरी, हा एक वेदनादायक आणि अत्यंत अस्वस्थ संसर्ग आहे.

मूत्रमार्गात जळजळ होणे, खाज सुटणे आणि लघवी थांबणे ही समस्या सर्वाधिक भेडसावते.

याबद्दल कुणीही मोकळेपणाने बोलण्यास टाळतात.

कोणत्या लोकांना UTI चा सर्वाधिक धोका आहे हे सांगणे कठीण आहे.

मात्र हे टाळण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

युरीन इन्फेक्शन हा कोणत्याही प्रकारच्या संसर्गाने होणारा संसर्ग नसून काही लोकांच्या मते हा संसर्ग टॉयलेट सीटमधून पसरतो.

डॉक्टरांच्या मते, अशा पृष्ठभागावर बॅक्टेरिया जास्त काळ जगत नाहीत.

महिलांच्या मूत्रमार्गाचा थेट टॉयलेट सीटशी संपर्क येत नाही

त्यामुळे टॉयलेट सीटमधून इन्फेक्शन होण्याची शक्यता नगण्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतीय शैलीतील टॉयलेट सीटला शरीराचा स्पर्श होत नाही.

या प्रकरणात संसर्ग होण्याची शक्यता नाही.

मात्र, वेस्टर्न स्टाइलच्या टॉयलेट सीटला मध्ये शरीराला स्पर्श होतो.

त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.