सेन्सॉर बोर्डाने ‘ओह माय गॉड 2’ चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतलाय.

या चित्रपटातील काही दृश्यांमुळे लोकांच्या भावना दुखावतील , असं सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी म्हटलंय.

भगवान शिव यांचा रेल्वेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात येतो, असं एक दृश्य या चित्रपटात आहे. त्यावर आक्षेप घेण्यात आलाय.

 सेन्सॉर बोर्डाने अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ हा चित्रपट रिव्ह्यू समितीकडे परत पाठवलाय.

‘आदिपुरुष’ नंतर आता पुन्हा कोणत्या चित्रपटावरून वाद व्हायला नको म्हणून सेन्सॉर बोर्डाने सावध भूमिका घेतली आहे.

‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट देवाच्या विषयावर असल्याने रिव्ह्यू समिती सगळ्या बाबींचा काळजीपूर्वक विचार करेल.

 या चित्रपटात अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतमही झळकणार आहे.

‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट 11  ऑगस्टला रिलीज होणार आहे.