Published March 21, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
सनातन धर्मात चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. चैत्रामध्ये कसश स्थापना कधी करायची, जाणून घ्या
पंचागानुसार, चैत्र नवरात्रीची सुरुवात 30 मार्च रोजी होईल. याची समाप्ती 7 मार्च रोजी होईल. यावेळी देवी दुर्गेची पूजा केल्याने संकटे दूर होतात.
अमावस्या तिथीला कलश बसवणे टाळावे. असे केल्याने माता दुर्गा रागावू शकतात आणि पूजेचे फळ मिळणार नाही.
तुम्ही रात्री कलशाची स्थापना केली तर तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नेहमी शुभ मुहूर्तावर कलश स्थापना करा
कलश स्थापनेसाठी 30 मार्च रोजी सकाळी 6.13 पासून 10.22 पर्यंत शुभ मुहूर्त राहील. या शुभ काळात घटस्थापना केल्याने शुभ फल प्राप्त होते.
30 मार्च रोजी 12.01 पासून दुपारी 12.50 पर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर कलश स्थापना केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
यावेळी ओम आ जिघ्र कलश मह्या त्वा विशन्त्विन्दव: या मंत्राचा जप करावा. याची उपासना केल्याने शुभ फळ मिळते आणि प्रगतीची शक्यता असते.
चैत्र नवरात्रीमध्ये पूजा करताना दुर्गादेवीला लाल चुनरी आणि श्रृंगाराचे सामान अर्पण करावे. याशिवाय हिबिस्कसचे फूल अर्पण केल्याने मातेचा आशीर्वाद मिळतो.