भारताने इतिहास रचत बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग केले.
या लँडिंगनंतर गुरुवारी अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी मार्केटमध्ये उसळी घेतली.
ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यांनी चांद्रयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीही उत्तम होते.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर 11% वाढून 1,820.15 रुपयांवर व्यवहार करत होता.
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीचा स्टॉक सुरुवातीच्या व्यापारात 12.45% वाढून 807.05 रुपयांवर पोहोचला.
MTAR tech चा शेअरही 7.40 टक्क्यांच्या उच्च वाढीसह 2384.90 रुपयांवर व्यवहार करत होता.
याशिवाय गोदरेज इंडस्ट्रीजचा शेअरही 3.49 टक्क्यांनी वाढून 549.55 रुपयांवर पोहोचला आहे.