देशासाठी मोठा दिवस आहे, 14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेले चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
इस्रो आणि देशातील जनता तसेच भारतीय शेअर बाजारही चांद्रयान 3 च्या लँडिंगवर लक्ष ठेवून आहे.
टाटा ते गोदरेजपर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांनी चांद्रयान 3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
टाटा स्टील निर्मित या क्रेनने LVM3 M4 (फॅट बॉय) लाँच व्हेइकल असेंबल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अशा परिस्थितीत या कंपनीच्या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळू शकते.
BHEL ने मिशनसाठी बॅटरी आणि इतर घटक पुरवले आहेत, त्याच्या शेअर्समध्येही तेजी दिसू शकते.
Larsen & Toubro (L&T) ने अनेक भाग पुरवले आहेत. कंपनीने LVM-3 M-4 तयार करण्यात हातभार लावला आहे.
वालचंदनगर इंडस्ट्रीजने चांद्रयान प्रक्षेपणासाठी कंपोनंटचा पुरवठा केला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स, पारस डिफेन्स, एमटीआर आणि गोदरेजचे शेअर्सही तेजीत येऊ शकतात, या मिशनमध्ये या कंपन्यांचीही मोठी भूमिका आहे.
HAL चा शेअरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.