'विक्रम' आणि 'प्रज्ञान' यांचे चंद्रावर नेमके काम काय?
चांद्रयान-3 मोहिमेतील लँडरचे नाव 'विक्रम' आहे.
'विक्रम' लँडर चंद्रावर पोहोचल्यानंतर त्यातून रोव्हर बाहेर येईल त्याचे नाव आहे 'प्रज्ञान'.
वेग नियंत्रित करून आणि योग्य ठिकाण निवडून विक्रम लँडर हळूहळू चंद्रावर उतरेल
विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर रोव्हर 'प्रज्ञान'चे काम सुरू होईल.
चंद्रावरून डेटा गोळा करण्याचे काम 'प्रज्ञान' करेल.
चंद्राच्या पृष्ठभागावर भारताची निशाणी प्रज्ञानच सोडेल.
जेव्हा रोव्हरचे मागील चाक पुढे सरकेल तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह छापले जाईल.
तर रोव्हरचे दुसरे मागचे चाक इस्रोचे चिन्ह छापेल