चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला

'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगवर अक्षय कुमारने ट्विट केले - "कोट्यवधी जनता यावेळी 'इस्त्रोचे आभार' मानत आहे."

एकीकडे सनी देओल 'गदर 2' चे यश तर दुसरीकडे 'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनेत्याने अभिनंदन केले आहे.

अजय देवगणने लिहिले - "अभिमान वाटत आहे.  गर्व आहे भारतीय असल्याचा"

काजोलने ट्विट करून आनंद व्यक्त केला.'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्रोचे खूप खूप अभिनंदन."

हृतिक रोशनने लिहिले- "माझी छाती अभिमानाने फुलून येत आहे. इस्रोने इतिहास रचला 'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनंदन"

बॉक्सर विजेंदर सिंगनेही ट्विट करून लिहिले- "अभिनंदन भारत" 

सिद्धार्थ मल्होत्राने लिहिले - "आजचा दिवस भारतीयांसाठी ऐतिहासिक होता. 'चांद्रयान 3' साठी अभिनंदन."

रिएलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादवनेही 'प्राउड इंडियन' असे ट्विट केले आहे