इस्रोची चांद्रयान- 3 या तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
इस्रोचं चांद्रयान 3 अंतराळयान 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
चांद्रयान-3 हा इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरा टप्पा आहे.
चांद्रयान-2 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
आता पुन्हा एकदा चांद्रयान-3 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जाईल.
चार वर्षांनंतर इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.
सप्टेंबर 2019 मध्ये चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. पण, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलं.
चांद्रयान-3 चं एकूण वजन 3900 किलो आहे. या मोहिमेसाठी सुमारे 615 कोटी रुपये खर्च आला आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.
चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 चे लघु मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात वैज्ञानिक दर्शनासाठी गेले आहेत.