कारचा रंग बदलेल एका बटणावर! BMW च्या E-Ink Technology चे रहस्य काय?

Automobile

11 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

E-Ink म्हणजे Electronic Ink Technology. यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेप्रमाणे विशेष मटेरियलचा वापर केला जातो. यामुळे कारच्या बाहेरील पृष्ठभागाचा रंग किंवा पॅटर्न बदलणे शक्य होते.

काय आहे E-Ink Car Body?

Picture Credit:pinterest

E-Ink पृष्ठभागामध्ये सूक्ष्म कॅप्सूल किंवा इलेक्ट्रॉनिक घटक असतात. त्यांना नियंत्रित इलेक्ट्रिक सिग्नल दिल्यावर त्यांचा रंग बदलतो. त्यामुळे कारच्या बॉडीवर वेगळा लूक दिसू शकतो.

कसे काम करते हे तंत्रज्ञान?

Picture Credit:pinterest

कल्पना करा, सकाळी तुमची कार पांढऱ्या रंगात आणि संध्याकाळी काळ्या रंगात! भविष्यात अशा प्रकारे उपलब्ध रंगांमध्ये बदल करण्याची सुविधा मिळू शकते.

एका बटणावर रंग बदलणार!

Picture Credit:pinterest

या तंत्रज्ञानाच्या प्रगत स्वरूपातून कारवर वेगवेगळे पॅटर्न, ग्राफिक्स किंवा डिझाइन दाखवणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कारला प्रत्येक वेळी नवा लूक देता येईल.

फक्त रंगच नाही, डिझाइनही बदलेल?

Picture Credit:pinterest

BMW ने CES 2022 मध्ये iX Flow ही कॉन्सेप्ट कार सादर केली होती. तिच्या बॉडीवर E Ink तंत्रज्ञानाचा वापर करून पांढरा आणि काळा रंग बदलून दाखवण्यात आला होता.

BMW ने दाखवली होती झलक!

Picture Credit:pinterest

– कारला वेगळा लूक देता येईल. – पारंपरिक पेंटिंगची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. – वैयक्तिक आवडीनुसार डिझाइन बदलता येईल. – भविष्यात कार कस्टमायझेशनला नवी दिशा मिळू शकते.

काय आहेत याचे फायदे?

Picture Credit:pinterest

हे तंत्रज्ञान अजून प्रायोगिक आणि विकासाच्या टप्प्यात आहे. त्याची किंमत, टिकाऊपणा, हवामानाचा परिणाम आणि दुरुस्ती यांसारखी आव्हाने आहेत. त्यामुळे प्रत्येक कारमध्ये ही सुविधा कधी येईल, हे अद्याप स्पष्ट नाही.

काही मर्यादाही आहेत!

Picture Credit:pinterest

भविष्यात कारचा रंग बदलण्यासाठी गॅरेजमध्ये जाण्याऐवजी बटण दाबणे पुरेसे ठरू शकते. E-Ink Car Body Technology ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक वेगळी क्रांती ठरू शकते!

कारचे भविष्य बदलणार?

Picture Credit:pinterest