आचार्य चाणक्य यांनी आयुष्य जगण्याचं सूत्र कायम सांगितलेलं आहे.
आचार्य चाणक्य यांचे विचार आजच्या युगातही अतिशय समर्पक आहेत.
आचार्य चाणक्य म्हणतात की काही व्यक्तींकडे पैसा टिकत नाही.
त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी पैसा त्यांच्या हातात येता क्षणी खर्च होतो.
चाणक्य म्हणतात की, जो माणूस नेहमी गलिच्छ राहतो किंवा घाणेरडे कपडे घालतो, त्याच्याजवळ पैसा टिकत नाही.
जे लोक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत झोपतात, त्यांच्या हातातही पैसा टिकत नाही.
आचार्य चाणक्य म्हणतात की, लक्ष्मी नेहमी अस्वच्छतेपासून दूर जाते.
तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च केलात तर तुमच्याकडे कधीच पैसा राहणार नाही.
अशा व्यक्ती कितीही मोठ्या झाल्या तरी त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही.