चाणक्य नीतीनुसार माणसाला त्याच्या कर्माप्रमाणेच सन्मान मिळतो.
तुम्ही तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला मूर्ख ठरवले जाते.
नेहमी नव्या गोष्टी शिकत राहाव्या, अन्यथा समाजात तुमचा मान राहात नाही.
स्वत:चं कौतुक, स्तुती स्वत: कधीच करू नये, असंही चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलंय.
कधीही स्वत:लाच फक्त ज्ञानी समजू नये, समाजात तुमच्यापेक्षाही ज्ञानी माणसं असतात.
सतत समोरच्याचा अपमान करणाऱ्यांनाही समाजात स्थान दिले जात नाही.
पैशाचा, धनाचा गर्व असलेल्यांनाही समाजात स्थान मिळत नाही.
चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.