ChatGPT एक उपयोगी चॅटबॉट आहे. आता अँड्रॉइड युजर्सना चॅटजीपीटी अॅप वापरता येणार आहे.
ios वापरणाऱ्यांसाठी सुरुवातीला हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. मात्र आता ते अँड्रॉइड मोबाईलवरही उपलब्ध होणार आहे.
यामुळे गुगल बार्डच्या चिंतेत वाढ होऊ शकते. कारण AI चॅटबॉटच्या स्पर्धेत वाढ झाली आहे.
बार्डकडे समर्पित मोबाईल अॅप उपलब्ध नाही. ते वेब आधारित इंटरफेसवर चालतं.
चॅटजीपीटी अँड्रॉइड युजर्ससाठी
उपलब्ध होणार असल्याने गुगल बार्डवर क्षमता वाढवण्यासाठी दबाब येऊ शकतो.
Microsoft च्या Bing सारखे इतर चॅटबॉट पर्यायही उपलब्ध आहेत.
सध्या अँड्रॉइडसाठी चॅटजीपीटी अॅप फक्त डाऊनलोड करता येणार आहे. पुढच्या आठवड्यापासून अॅप वापरता येणार आहे.
कंपनीने ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे.
प्ले-स्टोरवर ChatGPT
अॅप
डाऊनलोड करताना ‘Register’ चा पर्याय तुम्हाला दिसेल.