धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे या दिवसात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. चातुर्मासाचा कालावधी 4 महिने असतो.
चातुर्मासात तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील अंधाराचे प्रकाशात रुपांतर होऊ शकते.
तुळशीजवळ ही गोष्ट जाळल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या समस्या दूर होतात. कोणती गोष्ट तुळशीजवळ जाळावी, जाणून घ्या
चातुर्मासामध्ये तुळशीजवळ तूप किंवा तेलाचा दिवा लावावा.
चातुर्मासामध्ये तुळशीजवळ तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात धनप्राप्ती होते.
ज्या लोकांना कर्जाच्या समस्या असतील त्यांनी चातुर्मासामध्ये तूप किंवा तेलाचा दिवा लावल्यास कर्ज समस्येपासून सुटका होईल.
घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करुन सकारात्मक ऊर्जा पाहिजे असल्यास तुळशीसमोर तूप किंवा तेलाचा दिवा लावावा.
ज्यांच्याकडे घरात वारंवार भांडण होत असतील त्यांनी तुळशीजवळ तूप किंवा तेलाचा दिवा लावावा.