Himalayan 450ला टक्कर! या 3 Adventure Bikesमध्ये कोणती आहे खास?

Automobile

18 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Himalayan 450 मध्ये 452cc इंजिन आहे. ते 39.47 bhp पॉवर आणि 40 Nm टॉर्क देते. 17 लिटरची टाकी, 230mm ग्राउंड क्लीअरन्स आणि 196 किलो वजन मिळते.

Himalayan 450 मध्ये काय मिळतं?

Picture Credit:royalenfield

KTM 390 Adventure ची एक्स-शोरूम किंमत ₹2.88 लाखांपासून सुरू होते. 349.32cc इंजिन 40.93 bhp पॉवर आणि 33.5 Nm टॉर्क देते. वजन 181 किलो असून 14.5 लिटरची टाकी आहे.

KTM 390 Adventure

Picture Credit:ktmindia

Himalayan 450 पेक्षा KTM 390 Adventure तब्बल 15 किलो हलकी आहे. त्यामुळे शहरातील ट्रॅफिक आणि कमी वेगातील रायडिंगमध्ये वजनाचा फायदा होऊ शकतो. 28 kmpl मायलेज आणि 155 kmph टॉप स्पीडचा दावा आहे.

KTMची खासियत

Picture Credit:ktmindia

Premium Adventure Bike हवी असेल तर BMW F 450 GS हा पर्याय आहे. किंमत ₹4.95 लाखांपासून ₹5.60 लाखांपर्यंत आहे. यात 420cc ट्विन-सिलेंडर इंजिन असून सुमारे 48 bhp पॉवर आणि 43 Nm टॉर्क मिळतो.

BMW F 450 GS

Picture Credit:bmw

BMW F 450 GS मध्ये 6.5-इंच TFT डिस्प्ले, नेव्हिगेशन आणि कॉल कंट्रोल्स मिळतात. काही व्हेरिएंटमध्ये Adjustable KYB Suspension आणि Tubeless Cross-Spoke Wheelsही आहेत.

BMWमध्ये फीचर्सही जबरदस्त

Picture Credit:bmw

कमी बजेटमध्ये Adventure Bike शोधत असाल तर Yezdi Adventureचा पर्याय आहे. किंमत ₹2.09 लाख ते ₹2.33 लाख आहे. 334cc इंजिन, 187 किलो वजन आणि 15.5 लिटरची फ्युएल टाकी मिळते.

Yezdi Adventure

Picture Credit:jawayezdimotorcycles

KTM 390 Adventure — ₹2.88 लाख BMW F 450 GS — ₹4.95 लाखांपासून Yezdi Adventure — ₹2.09 लाखांपासून म्हणजेच तुमच्या बजेटनुसार पर्याय मोठ्या प्रमाणात बदलतो.

तिन्ही बाइक्समध्ये मोठा फरक

Picture Credit:jawayezdimotorcycles

फक्त किंमत पाहून बाइक निवडू नका. वजन, फ्युएल टँक, सीट हाइट, सर्व्हिस नेटवर्क, स्पेअर पार्ट्स, ग्राउंड क्लीअरन्स आणि सस्पेन्शन यांचाही विचार करा. तुमचा वापर शहरात, हायवेवर की ऑफ-रोड आहे, हेही महत्त्वाचं आहे.

कोणत्या गोष्टी पाहाव्यात?

Picture Credit:bmw

Himalayan 450 व्यतिरिक्त KTM 390 Adventure, BMW F 450 GS आणि Yezdi Adventure हे वेगवेगळ्या बजेट आणि रायडिंग गरजांसाठी पर्याय देतात. तुमच्या वापरानुसार इंजिन, वजन, फीचर्स आणि किंमत यांची तुलना करून बाइक निवडता येईल.

Himalayan 450 शिवायही पर्याय!

Picture Credit:ktmindia