Published March 07, 2025
By Mayur Navle
Pic Credit - Pinterest & Social Media
छत्रपती शिवराय जसे तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. तसेच शंभूराजे अनेक जणांचे स्फूर्तीस्थान आहे.
सध्या देशभरात छावा चित्रपट जोरात चालत आहे. अभिनेता विकी कौशलने यात शंभूराजांची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.
छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांची किर्ती ही देशभर पोहोचली आहे.
छावा चित्रपटात शंभूराजांवर झालेले अमानवी अत्याचार देखील दाखवण्यात आले आहे. पण हे अत्याचार कुठल्या गडावर झाले?
अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव येथे बहादुर गड स्थित आहे. इथेच शंभुराजे आणि औरंगजेबाची भेट झाली.
याच बहादूर गडावर शंभूराजांचे डोळे काढण्यात आले. त्यामुळेच आज या गडाला धर्मवीर गड म्हणून ओळखण्यात येते.